कोळपिंपरीत एकाच दिवशी २२६ नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:24 IST2021-06-25T04:24:27+5:302021-06-25T04:24:27+5:30

ग्रामपंचायत कार्यालयात कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. त्यात १८ वर्षांपुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. एकूण ...

Vaccination of 226 citizens on the same day in Kolpimpi | कोळपिंपरीत एकाच दिवशी २२६ नागरिकांचे लसीकरण

कोळपिंपरीत एकाच दिवशी २२६ नागरिकांचे लसीकरण

ग्रामपंचायत कार्यालयात कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. त्यात १८ वर्षांपुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. एकूण २२६ नागरिकांना कोरोना लसीचा प्रथम डोस देण्यात आला. तीन जूनपासून गाव कोरोनामुक्त आहे. प्रत्येक नागरिकाला गावात लस मिळावी म्हणून ग्रामपंचायत व आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. यापूर्वीदेखील ४४ वर्षांपुढील २५० नागरिकांना एकाच दिवशी कोळपिंपरी गावातच लस दिली होती.

यावेळी आरोग्य विभागाचे अभिजित वाघमारे, गुणाल, दीक्षित, आशा व अंगणवाडीसेविका, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी लसीकरण पूर्ण केले.

सरपंच उषाबाई विजयकुमार खुळे म्हणाल्या, कोळपिंपरी गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी ग्रामपंचायतकडून जनजागृती सुरू असून या प्रयत्नाला आरोग्य विभागाचे सहकार्य मिळत आहे. प्रत्येक नागरिकास गावातच कोविडची लस देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

===Photopath===

240621\img-20210623-wa0101.jpg

===Caption===

कोळपिंप्री येथे लसीकरण

Web Title: Vaccination of 226 citizens on the same day in Kolpimpi