जिल्हा कारागृहातील २१० कैद्यांचे लसीकरण - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST2021-07-13T04:07:48+5:302021-07-13T04:07:48+5:30
जिल्हा कारागृहाला कोरोनाच्या पहिल्या लाटेचा तडाखा बसला होता. दुसऱ्या लाटेत मात्र कारागृह प्रशासनाने काटेकोर उपाय केले होते. त्यामुळे कैदी ...

जिल्हा कारागृहातील २१० कैद्यांचे लसीकरण - A
जिल्हा कारागृहाला कोरोनाच्या पहिल्या लाटेचा तडाखा बसला होता. दुसऱ्या लाटेत मात्र कारागृह प्रशासनाने काटेकोर उपाय केले होते. त्यामुळे कैदी सुरक्षित राहिले. दरम्यान, कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या बंदिवानांकडून इतरांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याने तात्पुरते कारागृह सुरु करण्यात आलेले आहे. त्यात कैद्यांना क्वारंटाईन केले जाते. यापूर्वी कारागृहातील ४५ वर्षांवरील ४६ कैद्यांना लस देण्यात आली होती. रविवारी २१९ कैद्यांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात आला. यासाठी कारागृह अधीक्षक विलास भोईटे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्रव्यवहार केला होता. प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ.बाबासाहेब ढाकणे, डॉ.औदुंबर नालपे, डॉ.अश्विनी कदम व आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण पूर्ण केले. वरिष्ठ तुरुंग अधिकारी एम.एस.पवार यांचीही येथे प्रमुख उपस्थिती होती.
....
नियमांचे काटेकोर पालन
कोरोना विषाणू संसर्गापासून कैद्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी कारागृहात योग्य त्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते. अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाचे दोन डोस देण्यात आले आहेत. कारागृहातील सर्व कैद्यांना पहिला डोस दिला असून तात्पुरत्या कारागृहातील क्वारंटाईन केलेल्या कैद्यांनाही लस दिल्याची माहिती कारागृह अधीक्षक विलास भोईटे यांनी दिली.
110721\151811_2_bed_17_11072021_14.jpeg
जिल्हा कारागृहा कैद्यांना लस देण्यात आली. यावेळी अधीक्षक विलास भोईटे, महादेव पवार, डॉ.बाबासाहेब ढाकणे, डॉ.औदुंबर नालपे आदी.