गढी साखर कारखान्यात १३१ नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST2021-07-27T04:35:10+5:302021-07-27T04:35:10+5:30

तालुक्यातील गढी आरोग्य उपकेंद्रात येथे सोमवारी आरोग्य विभागाच्या वतीने मोफत लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. ...

Vaccination of 131 citizens at Gadhi Sugar Factory | गढी साखर कारखान्यात १३१ नागरिकांचे लसीकरण

गढी साखर कारखान्यात १३१ नागरिकांचे लसीकरण

तालुक्यातील गढी आरोग्य उपकेंद्रात येथे सोमवारी आरोग्य विभागाच्या वतीने मोफत लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत गावातील १८ वर्षांपुढील १३१ पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. यासाठी १० आरोग्य कर्मचारी आरोग्य विभागाने नियुक्त केले होते. या शिबिरासाठी लागणारी सर्व मदत ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती. शिबिराचे उद्‌घाटन सरपंच अंकुश गायकवाड, उपसरपंच मंगेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल ससाने, रामदास मुंडे, रत्नाकर कुलकर्णी यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

वैद्यकीय अधिकारी डॉ.बलराज राठोड, डॉ.संदीप खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गढी येथील उपकेंद्रांमध्ये या लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये डॉ.वैभव दहिफळे, अमोल पत्की, सुरेश राठोड, एम.पी. डब्ल्यू खान, आरोग्यसेविका शिल्पा नरवडे, आशा स्वयंसेविका अरुणा तुपारे, शैला बारगजे, माया जावळे, मुमताज नूर, मुक्ता नाईकवाडे, अनिता कुलकर्णी, ज्योती दिवाण, शिक्षक बबनराव ढाकणे, राजेंद्र सोळुंके यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Web Title: Vaccination of 131 citizens at Gadhi Sugar Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.