साळेगाव येथे शंभर ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:29 IST2021-04-03T04:29:53+5:302021-04-03T04:29:53+5:30
केज : तालुक्यातील चिंचोली माळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या साळेगाव उपकेंद्रात शंभर ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे ...

साळेगाव येथे शंभर ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण
केज : तालुक्यातील चिंचोली माळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या साळेगाव उपकेंद्रात शंभर ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात आले. सरपंच कैलास जाधव, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आसाराम चौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण सुरू करण्यात आले. या प्रसंगी माजी उपसरपंच नामदेव गिते, माजी उपसरपंच सरस्वती पारखे, मुख्याध्यापक सूर्यकांत काळे, ज्योतीराम बचुटे, गौतम बचुटे, राजकुमार गिते, बलभीम बचुटे आदी उपस्थित होते. लसीकरण मोहिमेत डॉ. आसाराम चौरे, डॉ. दिपाली बुदगुडे, लांडगे मॅडम, बी. डी. माने, बर्डे मॅडम, शिंदे, खाडे, सरमल, एम. बी. मस्के, आशा स्वयंसेविका दैवशाला सरवदे, संजीवनी विघ्ने, अनुराधा इंगळे, शिला गायकवाड यांनी मदत केली.