लोकमत न्यूज नेटवर्क बीड : खंडणी व सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला कारागृहातही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे. तारीख व वेळेचाही उल्लेख करून २३ मुद्द्यांचे पत्र देशमुख यांच्या नातेवाइकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. यावर देशमुख कुटुंबाने माहिती अधिकारात सर्व माहिती घेणार असल्याचे सांगितले.
१५ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ९ दरम्यान कराड याला स्पेशल चहा तर १८ फेब्रुवारीला दुपारी ई-मुलाखतीकरिता कराड यास ऑफिसमध्ये बोलावून स्पेशल चहा, जेवण दिले. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी एका कर्मचाऱ्याने कराडला निकोटीन नशाचे औषध दिल्याचा आरोप पत्रात आहे.
याबाबत बीडचे कारागृह अधीक्षक मुलाणी यांच्याशी संपर्क केला. कारागृहातील एका व्यक्तीने फोन उचलला. ते जेवायला गेल्याचे सांगत बोलणे करून देणे टाळले.