वाहन चालविताना मोबाईलचा वापर धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST2021-07-05T04:21:11+5:302021-07-05T04:21:11+5:30
--------------------------- हॉटेलमधील गर्दीवर नियंत्रण हवे अंबाजोगाई : कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाने काही अटी व शर्तीवर हॉटेल व इतर ...

वाहन चालविताना मोबाईलचा वापर धोकादायक
---------------------------
हॉटेलमधील गर्दीवर नियंत्रण हवे
अंबाजोगाई : कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाने काही अटी व शर्तीवर हॉटेल व इतर व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, गर्दीवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. असे असले तरी शहरातील काही हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन गर्दीवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा कोरोनाच्या संसर्गाचा धोका उद्भवू शकतो.
----------------------------
पाईपलाईनमुळे रस्त्यावर खड्डे
अंबाजोगाई : पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अथवा नळ दुरुस्तीसाठी शहरातील विविध रस्त्यांचे खोदकाम करून पाईपलाईन टाकली जात आहे. मात्र रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविले जात नसल्याने अपघाताची शक्यता आहे. आता निर्बंध हटविण्यात आले असल्याने काम करून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
----------------------------
लॉन व्यावसायिकांना दिलासा
अंबाजोगाई : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाने संचारबंदी शिथिल केली आहे. त्यामुळे काही अटी व शर्तींवर लग्नसमारंभाला, तसेच सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. त्यामुळे लॉन व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
-------------------------------
जनजागृती फलक
अंबाजोगाई : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या अनुषंगाने प्रशासनाच्यावतीने शहरभर जनजागृती फलक लावण्यात आले आहेत. यासोबत सामाजिक संघटनेच्यावतीनेसुद्धा फलक लावून जनजागृती करण्यात आली आहे.
...