बसमध्ये पुन्हा तिकीट ट्रेचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST2021-08-18T04:39:26+5:302021-08-18T04:39:26+5:30

--------------------------- मुलींना कराटेचे प्रशिक्षण द्यावे अंबाजोगाई : दिवसेंदिवस मुलींच्या अत्याचारात वाढ होत आहे. त्यामुळे मुलींना आत्मसंरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण देण्यात ...

Use the ticket tray again in the bus | बसमध्ये पुन्हा तिकीट ट्रेचा वापर

बसमध्ये पुन्हा तिकीट ट्रेचा वापर

---------------------------

मुलींना कराटेचे प्रशिक्षण द्यावे

अंबाजोगाई : दिवसेंदिवस मुलींच्या अत्याचारात वाढ होत आहे. त्यामुळे मुलींना आत्मसंरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दररोज एक तरी मुलगी छेडछाडीची किंवा अत्याचाराची बळी ठरत आहे. मुलींना त्रास देणाऱ्या नराधमांना धडा शिकविण्यासाठी प्रत्येक गाव, तालुका, शहर पातळीवर मुलींना कराटेचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सुलभा सोळंके यांनी केली आहे.

-------------------------------

वजनकाट्यांची तपासणी करावी

अंबाजोगाई : दरवर्षी विक्रेत्यांच्या वजनकाट्याची तपासणी करण्याचे निर्देश आहेत. मात्र, अनेक व्यापाऱ्यांकडून या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. भाजी बाजारामध्ये तर अनेक विक्रेते वजनाऐवजी दगडाचा वापर करताना दिसून येत आहेत. त्यामुळे ग्राहकांची लूट होत असल्याचे दिसून येत आहे.

------------------------------

मोफत संगणक प्रशिक्षण द्यावे

अंबाजोगाई : सगळीकडे संगणकीय कामाला सुरुवात झाली आहे. संगणक साक्षरता वाढविणे गरजेचे आहे. पूर्वी शासनातर्फे मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येत होते. मात्र, आता हे प्रशिक्षण बंद करण्यात आले आहे. याउलट खासगी संगणक चालक वारेमाप पैसे घेतात. त्यामुळे गरजू व गरीब विद्यार्थी ते शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे शासनाने मोफत संगणक प्रशिक्षण शिबिर राबवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धनराज पवार यांनी केली आहे.

------------------------------

कोंडवाड्यांच्या दुरवस्थेमुळे जनावरांचे हाल

अंबाजोगाई : अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीने कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, निधीअभावी कोंडवाड्याची दुरवस्था झाल्याने जनावरांचे हाल होत आहेत. याकडे लक्ष देऊन सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Use the ticket tray again in the bus