सॅनिटायझरचा वापर पुन्हा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:33 IST2021-03-21T04:33:02+5:302021-03-21T04:33:02+5:30
गेल्या वर्षभरापासून नागरिकांना कोरोनाची धास्ती बसलेली आहे. गतवर्षी कोरोना आला, त्यावेळी सॅनिटायझर का व कसे वापरावे, याबाबत नागरिकांना फारशी ...

सॅनिटायझरचा वापर पुन्हा वाढला
गेल्या वर्षभरापासून नागरिकांना कोरोनाची धास्ती बसलेली आहे. गतवर्षी कोरोना आला, त्यावेळी सॅनिटायझर का व कसे वापरावे, याबाबत नागरिकांना फारशी माहिती नव्हती. मात्र, कोरोनामुळे अनेक जणांचे गेलेले बळी, परिसरातील व अनेकांच्या कुटुंबातील कोरोना रुग्णांचे अनुभव पाहून व ऐकून तसेच शासनाने कोरोनाबाबत केलेली जनजागृती यातून आता नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. अनेकांना झालेला त्रास पाहता आता मास्क व सॅनिटायझरच्या वापराबाबत प्रत्येक कुटुंबाने पुढाकार घेतल्याने घरोघरी सॅनिटायझरचा वापर सुरू झाला आहे. मास्कचा वापर, सामाजिक अंतर व हाताची स्वच्छता ही त्रिसूत्री शासनाने शिकविली. कुठे स्पर्श झाला अथवा सार्वजनिक ठिकाणातून घरी आल्यानंतर सॅनिटायझरच्या वापराला प्रथम प्राधान्य दिले जात आहे. अंबाजोगाई तालुक्यात जुलै महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण निघू लागले. गेल्या आठ महिन्यांत तालुक्यात तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण निघाले. त्यामुळे अंबाजोगाई शहरात कोरोनाबाबत जनजागृती निर्माण होऊ लागली आहे. मास्क व सॅनिटायझर यांची विक्री दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे, अशी माहिती औषधाचे व्यापारी सुरेश झंवर यांनी दिली.