अवकाळीचा तडाखा, शेतमालाचे मातेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:31 IST2021-03-24T04:31:39+5:302021-03-24T04:31:39+5:30
शिरूर कासार : मंगळवारी पहाटेच अवकाळी पावसाने हजेरी लावली तर दुपारनंतर पुन्हा एकदा पाऊस आल्याने काढणी केलेल्या व शेतात ...

अवकाळीचा तडाखा, शेतमालाचे मातेरे
शिरूर कासार : मंगळवारी पहाटेच अवकाळी पावसाने हजेरी लावली तर दुपारनंतर पुन्हा एकदा पाऊस आल्याने काढणी केलेल्या व शेतात पडलेल्या गव्हाचा चिक होऊ पहातोय तर हरभऱ्याच्या घुगऱ्या होण्याची वेळ आली आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकाला ही बाधा पोहोचली आहे. हाती आलेले पिकाचे अचानक आलेल्या अवकाळी पावसाने मातेरे केले असल्याने शेतकरी पुन्हा एकदा चिंतेच्या गर्तेत सापडला आहे. यंदा पाणी भरपूर उपलब्ध असल्याने तालुक्यात गहू, हरभरा, पेरा मोठ्या प्रमाणावर झाला होता. बऱ्याच वर्षांनंतर घरच्या शेतातला गहू मिळणार म्हणून चांगली मेहनत ,खत, पाणी, औषध मारून गव्हाचे जोमदार पीक आणण्यात यश आले होते; मात्र अवकाळीने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले. काही शेतकरी पावसाआधीच माल घरात आणण्यात यशस्वी झाले; मात्र अनेक शेतकऱ्यांची
पसर
शेतातच आहे तर काहींचा काढणीला आलेला गहू उभाच आहे. मंगळवारी आलेल्या पावसाने गव्हाचा रंगही घालवला आणि हरभरासुद्धा भिजून फुगला. शेतकरी भिजलेल्या मालाकडे पहात काही हाती लागते का, या आशाळभूत नजरेने पहाणी करत आहे.
===Photopath===
230321\img20210323163334_14.jpg