अवकाळी, गारपिटीमुळे पिकांचे नुकसान, घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:30 IST2021-03-22T04:30:17+5:302021-03-22T04:30:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : तालुक्यातील काही महसूल मंडलांमध्ये शनिवारी वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे ...

अवकाळी, गारपिटीमुळे पिकांचे नुकसान, घरांची पडझड
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातील काही महसूल मंडलांमध्ये शनिवारी वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्यातील राजापूर परिसरात तुलनेने जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आमदार लक्ष्मण पवार यांनी रविवारी या भागात पाहणी करून माहिती घेतली. यावेळी कृषी पर्यवेक्षक आर. आर. चव्हाण, तलाठी ए. ए. गायकवाड, कृषी सहाय्यक एस. ई. शेळके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग थडके, प्रा. शाम कुंड, संजय आंधळे, गोपाल चव्हाण, शेख मोहम्मद, राहुल बेडके, अजिनाथ सोनवणे उपस्थित होते. आमदार पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, कांदा, भुईमूग व फळभाजी पिकांची पाहणी केली. काही घरांचीही पडझड झाल्याचे यावेळी दिसले. घरासह पिकांच्या झालेल्या नुकसानाबद्दल शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी, यासाठी तत्काळ पंचनामे करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना आमदार पवार यांनी प्रशासनाला केल्या. यावेळी राजापूर व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===Photopath===
210321\sakharam shinde_img-20210321-wa0036_14.jpg
===Caption===
गेवराई तालुक्यातील राजापूर भागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसनीची आ. लक्ष्मण पवार यांनी पाहणी केली.