शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाच्या तडाख्याने ४ एकरवरील टरबूज सडले; नुकसानीने शेतकऱ्याचे स्वप्न भंगले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:52 IST

टरबूज लागवड ते काढणीला येईपर्यंत लावलेले अडीज लाख रुपय पाण्यात गेले

- मधुकर सिरसटकेज : तालुक्यातील ग्रीनबेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील सोनेसांगवी  येथील शेतकऱ्याने पावणे चार एकर जमिनीवर अडीच लाख रुपये खर्च करून टरबूजाचे पीक जोपासले होते. शेतकऱ्याने जीवलावून  मशागत केल्यामुळे 1 ते 5 किलोपर्यंत टरबूज पोसले होते. ऐन तोडणी करून टरबूज विक्रीच्या वेळीच  15 ते 20 दिवस अवकाळी पावसाने झड लावल्यामुळे सर्व टरबूज जागेवर सडल्याने जवळपास १० लाख रुपयांची हानी झाली आहे.

सोनेसांगवी येथील राजाभाऊ भाऊसाहेब कणसे यांनी आपल्या पावणे चार एकर जमिनीवर मार्च महिन्यात 50 हजार रुपये खर्च करून टरबूज पिकाची 21 हजार रोपांची लागवड केली. त्यानंतर खतांसाठी 60 हजार रुपये, एक लाख रुपयांची किटकनाशक फवारणी केली. वेलीला 1 ते 5 किलो वजनाचे टरबूज पोसले होते. मे महिन्यात पहिली तोडणी करून विक्री करण्याच्या वेळीच अवकाळी पावसाने हजेरी लावली. दररोज ढगाळ वातावरण आणि पावसाची झड 15 ते 20 दिवस राहिल्याने टरबूज वेलीपासून आपोआपच तुटून बाजूला होत जागेवरच सडले. त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरात काहीच उत्पन्न पडले नाही. उलट लागवड, खत, फवारणीचा जवळपास अडीच लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून 10 लाख रुपयांची हानी झाली आहे. शासनाने या नुकसानीची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी राजाभाऊ कणसे यांनी तहसीलदार यांचेकडे केली आहे. 

नुकसानीचा पंचनामाया नुकसानीची माहिती मिळताच तालुका कृषी अधिकारी सागर पटाडे यांचे मार्गदर्शना खाली कृषी सहाय्यक योगेश लामतुरे, ग्राम महसूल अधिकारी बालाजी इंगळे यांनी राजाभाऊ कणसे यांच्या  शेतात जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामा केला आहे. यात त्यांच्या टरबूज पिकाची 100 टक्के नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी बालाजी इंगळे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

मुलाला कृषी दुकान टाकण्याचे स्वप्न भंगलेचांगले उत्पन्न मिळेल म्हणून अडीच लाख रुपये खर्च करून पावणे चार एकर  जमिनीवर टरबूजाचे पीक घेतले होते. ऐन तोडणीच्या वेळी अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. टरबूजाच्या उत्पन्नातून मिळणाऱ्या पैशावर मुलाला कृषी दुकान टाकून द्यायचे होते. आता कसे दुकान टाकून द्यायचे ? असा प्रश्न समोर असल्याची खंत नुकसानग्रस्त शेतकरी राजाभाऊ कणसे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसBeedबीड