मास्कचा असुरक्षित वापर घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:31 IST2020-12-29T04:31:31+5:302020-12-29T04:31:31+5:30
ट्रिपल सिटवाले जोरात अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात अनेक युवक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत एका ...

मास्कचा असुरक्षित वापर घातक
ट्रिपल सिटवाले जोरात
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात अनेक युवक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत एका दुचाकीवर बिनधास्तपणे ट्रिपल सीट फिरू लागले आहेत. ना कोणाच्या चेहऱ्यावर मास्क, ना कसली भीती, अशा स्थितीत सुसाट वेगाने वाहन चालविण्यास तरूणाई धन्यता मानत आहे. कर्णकर्कश हॉर्न वाजवत रस्त्याने होणारे मार्गक्रमण मागे पुढे चालणाऱ्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. पोलीस प्रशासनाने अशा वाहनचालकांचा बंदोबस्त करावा.
राजकीय हालचालींना वेग
अंबाजोगाई : ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी अंबाजोगाई तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तयारी केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली असून या ग्रामपंचायत निवडणुकीला आपला पॅनल अग्रेसर कसा ठरेल? या दृष्टीने राजकीय हालचाली वेग घेऊ लागल्या आहेत.