विनामास्क दुकानदारी भोवली; २० हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST2021-03-13T04:59:17+5:302021-03-13T04:59:17+5:30
माजलगाव नगरपालिकेकडून शहरात दररोज विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाया सुरू आहेत. गुरुवारी या कर्मचाऱ्यांनी दुकानात विनामास्क बसलेल्या ...

विनामास्क दुकानदारी भोवली; २० हजारांचा दंड वसूल
माजलगाव नगरपालिकेकडून शहरात दररोज विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाया सुरू आहेत. गुरुवारी या कर्मचाऱ्यांनी दुकानात विनामास्क बसलेल्या दुकान मालकांकडून दंड वसूल केला. दुकान मालकाला ५०० रुपये, तर रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांंकडून २०० रुपये दंड वसूल केला.
नगरपालिकेने आतापर्यंत ५५ हजार २०० रुपये दंड वसूल केल्याची माहिती शिवहर शेटे यांनी दिली. कारवाई करणाऱ्या पथकात
गणेश डोंगरे, फुलचंद कटारे, भुजंग गायकवाड, सुधाकर उजगरे, विलेश कांबळे, संकेत साळवे, सागर उजगरे, पांडुरंग कुलकर्णी, संतोष घाडगे, आदींचा समावेश होता.
तहसीलकडून एकच दिवस कारवाई
येथील तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना कारवाया करण्याचे आदेश दिले. त्यानंतर एक दिवस केवळ एकच तास तहसीलदारांच्या उपस्थितीत कारवाया केल्या. त्यानंतर तहसीलचा एकही कर्मचारी दिसला नाही. यामुळे तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांविरोधात नगरपालिका कर्मचाऱ्यांत रोष निर्माण होत आहे.
===Photopath===
110321\purusttam karva_img-20210311-wa0026_14.jpg
===Caption===
माजलगावात नगर परिषदेच्या पथकाने गुरूवारी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांसह दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली.