केंद्रीय पथक आज बीड जिल्ह्यात पाहणी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:53 IST2019-11-22T23:52:00+5:302019-11-22T23:53:05+5:30
अवेळी झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक दौऱ्यावर असून, बीड जिल्ह्यात २३ नोव्हेंबर रोजी हे पथक पाहणी करणार आहे. व्ही. थिरु प्पुगाझ हे या पथकाचे प्रमुख असून डॉ. के. मनोहरन हे सदस्य आहेत.

केंद्रीय पथक आज बीड जिल्ह्यात पाहणी करणार
बीड : अवेळी झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक दौऱ्यावर असून, बीड जिल्ह्यात २३ नोव्हेंबर रोजी हे पथक पाहणी करणार आहे. व्ही. थिरु प्पुगाझ हे या पथकाचे प्रमुख असून डॉ. के. मनोहरन हे सदस्य आहेत.
सकाळी ११ वाजेदरम्यान धोंडराई ता. गेवराई येथे आगमन व कापूस पिकाची पाहणी केली जाणार आहे. तेथून बागपिंपळगाव, रांजणी, वाहेगाव आमला या गावात भेट देवून कापूस व बाजरी पिकाची पथक सदस्य पाहणी करुन शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. तेथून माजलगाव तालुक्यातील माजलगाव येथे डाळिंब पिकाची पाहणी करणार आहेत. दुपारी ३ नंतर धारु र तालुक्यातील तेलगाव, वडवणी तालुक्यातील पुसरा येथे भेट देवून सोयाबीन, कापूस व बाजरी पिकाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर बीड तालुक्यातील घाटसावळी येथे भेट देवून सायंकाळी शासकीय विश्रामगृह बीड येथे आढावा बैठक घेण्यात येणार आहे.