केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा मन्मथ स्वामींच्या चरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2022 18:53 IST2022-12-29T18:51:00+5:302022-12-29T18:53:19+5:30

कर्नाटकातील बिदर मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय रसायने व खते विभागाचे राज्यमंत्री भगंवत खुबा बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत.

Union Minister of State Bhagwant Khuba visited Manmath Swamy temple at Kapildhar | केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा मन्मथ स्वामींच्या चरणी

केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा मन्मथ स्वामींच्या चरणी

- विशाल शिंदे
नेकनुर ( बीड) :
बीड तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री संत मन्मथ स्वामी यांचे समाधीस्थळ श्रीक्षेत्र कपिलधार येथे आज केंद्रीय रसायन व ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी पत्नी व मुलासह भेट दिली. राज्यमंत्री खुबा यांनी सहकुटुंब मन्मथ स्वामींच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत मोठ्या श्रध्देने अभिषेक केला.

कर्नाटकातील बिदर मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय रसायने व खते विभागाचे राज्यमंत्री भगंवत खुबा बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज दुपारी त्यांनी जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान मन्मथ स्वामींच्या समाधीस्थळी सहकुटुंब भेट दिली. देवस्थान पंचकमिटीकडून राज्यमंत्री खुब्बा यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर राज्यमंत्री खुबा यांनी मन्मथ स्वामींचे कुटुंबासह दर्शन घेतले. दरम्यान, राज्यमंत्री खुबा यांनी कपिलधार परिसराचा आढावा घेतला. यावेळी श्री मन्मथ स्वामी देवस्थान पंचकमिटीने मंदिरासाठी केंद्रीय निधीतून सौरपॅनल व पवन ऊर्जास्रोताची मागणी केली. त्यावर मंत्र्यांनी मागण्या लवकरच मान्य करून मार्गी लावू, असे आश्वासन दिले.
 

Web Title: Union Minister of State Bhagwant Khuba visited Manmath Swamy temple at Kapildhar

टॅग्स :Beedबीड