सुंदर माझे कार्यालय अभियान अंतर्गत पं. स. चा परिसर केला स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:27 IST2021-01-02T04:27:38+5:302021-01-02T04:27:38+5:30
सुंदर माझे कार्यालय या अभियानांतर्गत मूल्यांकन करून जिल्ह्यात प्रथम, द्वितीय व तृतीय या क्रमांकानुसार बक्षीस देण्यात येणार आहे. त्यानुसार ...

सुंदर माझे कार्यालय अभियान अंतर्गत पं. स. चा परिसर केला स्वच्छ
सुंदर माझे कार्यालय या अभियानांतर्गत मूल्यांकन करून जिल्ह्यात प्रथम, द्वितीय व तृतीय या क्रमांकानुसार बक्षीस देण्यात येणार आहे. त्यानुसार तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने १ जानेवारी रोजी नववर्षाच्या सुरुवातीला कार्यालयासह परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांच्यासह आर. बी. महामुनी, अयास सिद्दीकी, लक्ष्मण पोटभरे, संजय राठोड, रवि आदमाने आदीसह कार्यालयातील सर्व कर्मचारी स्वच्छता कामी सहभागी होते.
माजलगाव नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानअंतर्गत माझी वसुंधरा शपथ घेत राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान येथे स्वच्छता अभियान राबविले. तसेच शहर प्रदूषणमुक्त करण्याची शपथ घेत वृक्षारोपण केले. यावेळी नगराध्यक्ष शेख मंजुर, मुख्याधिकारी विशाल भोसले, आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापक वैशाली नाईकनवरे , छाया टाकळकर , व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, न. प. चे कार्यलयीन अधीक्षक गणेश डोंगरे, अभियंता जगदीश जाधवर, नगररचनाकार आशिष तुसे व सर्व नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.