स्टेडियम परिसरात अस्वच्छता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:29 IST2021-02-05T08:29:02+5:302021-02-05T08:29:02+5:30

स्वच्छतागृहाची दुर्दशा, महिला प्रवासी त्रस्त चौसाळा : बीड तालुक्यातील चौसाळा येथील बसस्थानकात असलेल्या स्वच्छतागृहाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे प्रवाशांसह ...

Uncleanliness increased in the stadium area | स्टेडियम परिसरात अस्वच्छता वाढली

स्टेडियम परिसरात अस्वच्छता वाढली

स्वच्छतागृहाची दुर्दशा, महिला प्रवासी त्रस्त

चौसाळा : बीड तालुक्यातील चौसाळा येथील बसस्थानकात असलेल्या स्वच्छतागृहाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे प्रवाशांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. महिलांसाठी असलेले शौचालय बंद असल्यामुळे त्यांचीदेखील कुचंबणा होत आहे. आगार प्रमुखांनी लक्ष देत स्वच्छतागृहाची दुरुस्ती करून गैरसोय दूर करण्याची मागणी आहे.

नेकनूर ते नांदूर रस्त्याची दुरवस्था

नेकनूर : बीड तालुक्यातील नेकनूर ते केज तालुक्यातील नांदूरघाट या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. दोन्ही गावे मोठ्या बाजारपेठेची असल्यामुळे रहदारी कायम असते; मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

खड्ड्यांतून वाहतूक

बीड : माजलगाव तालुक्यातील टाकरवण परिसरात टाकरवण ते टाकरवणफाटा-राजेगाव या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याच खड्ड्येमय रस्त्यांवरून वाहने वाहतूक करीत आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान होऊन अपघातास निमंत्रण मिळत आहे.

वीजचोरी वाढली; कारवाईची मागणी

बीड : तालुक्यातील पालसिंगण येथे विजेच्या तारांवर आकडे टाकून वीजचोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावामध्ये नेहमी वीजपुरवठा खंडित होण्यामध्ये वाढ झाली आहे. याकडे महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतच्यावतीने करण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी हटेना

बीड : शहरातील भाजीमंडईत वर्दळ वाढली आहे. येथील अरुंद रस्ते व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पालिका अथवा पोलिसांकडून यावर कसलीच कारवाई अथवा उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. नियोजन करून ही कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.

Web Title: Uncleanliness increased in the stadium area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.