गेवराईमध्ये विषय समितीच्या बिनविरोध निवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:39 IST2018-01-23T00:39:46+5:302018-01-23T00:39:55+5:30
गेवराई येथील नगरपरिषदेच्या विषय समितीच्या निवडी बिनविरोध झाल्या. यामध्ये पाणीपुरवठा सभापती म्हणून रितू अरुण मस्के, बांधकाम सभापती म्हणून राहुल खंडागळे, महिला बालकल्याण सभापती रेवती भगवान घुंबार्डे, शिक्षण सभापती मोमीन मोजम, महिला बालकल्याण उपसभापती आयशा सिद्धीका याहीया खान यांची निवड करण्यात आली.

गेवराईमध्ये विषय समितीच्या बिनविरोध निवडी
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : येथील नगरपरिषदेच्या विषय समितीच्या निवडी बिनविरोध झाल्या. यामध्ये पाणीपुरवठा सभापती म्हणून रितू अरुण मस्के, बांधकाम सभापती म्हणून राहुल खंडागळे, महिला बालकल्याण सभापती रेवती भगवान घुंबार्डे, शिक्षण सभापती मोमीन मोजम, महिला बालकल्याण उपसभापती आयशा सिद्धीका याहीया खान यांची निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार संजय पवार व मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी काम पाहिले. या निवडीबद्दल सर्व नवनिर्वाचित सभापतींचे नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षभुवनकर यांच्यासह निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते डस्टबिन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व नगरसेवक कार्यकर्ते यांच्यासह आदींची उपस्थिती होती.