गेवराई शहरासह उमापूर, तलवाडा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:51 IST2018-01-02T23:51:34+5:302018-01-02T23:51:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी गेवराई शहर बंद ठेवण्यात आले. दलीत बांधवांच्यावतीने तहसीलदार ...

गेवराई शहरासह उमापूर, तलवाडा बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी गेवराई शहर बंद ठेवण्यात आले. दलीत बांधवांच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करत शांततेचे आवाहन केले. तसेच उमापूर व तलवाडा येथेही बंद पाळण्यात आला.
सकाळी शहरात फिरून व्यापाºयांना बंद ठेवण्याची विनंती करुन फेरी मारली. यावेळी धम्मपाल कांडेकर, गौतम कांडेकर, प्रकाश भोले, गोरख सौंदरमल, मोंन्टी माटे, भैया सौंदरमल, धम्मापाल भोले, उमेश चौंडिया, आनंद सुतार, विकी कांडेकर, शुभम सौंदरमल, शुभम सोनवणे, विजय सौंदरमल, भाऊराव कांडेकर, पिंटू साळवे, भारत शिंदे, समाधान शिंदे, रजनी सुतार यांच्यासह अनेक दलित बांधवांच्या वतीने गेवराई तहसीलदार यांना निवेदन देऊन शांततेच्या मार्गाने बंद करण्यात करण्यात आला.
याला व्यापारी यांनी ही चागंला प्रतिसाद दिला. तसेच तालुक्यातील उमापूर व तलवाडा येथे पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.