दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:29 IST2021-04-05T04:29:12+5:302021-04-05T04:29:12+5:30
अंबेजोगाई : गेल्या काही महिन्यात अंबेजोगाई तालुक्यात व शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहन चालक ...

दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा
अंबेजोगाई : गेल्या काही महिन्यात अंबेजोगाई तालुक्यात व शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहन चालक आपले वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत, तसेच अनेक युवक शहरातही गर्दीच्या ठिकाणी सुसाट वेगाने वाहन चालवितात. परिणामी, अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शासनाने हेल्मेटचा वापर सक्तीचा करूनही अनेक दुचाकी चालक हेल्मेटचा वापर करत नाहीत. त्यामुळे अपघात झाल्यास मोठ्या आजाराचा सामना करावा लागतो. यासाठी हेल्मेटला प्राधान्य द्या, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रवि मठपती यांनी केले आहे.
कित्येक महिन्यांपासून घरकुलाचे हप्ते थकले
बीड : कित्येक महिन्यांपासून बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचे थकलेले हप्ते नगरपरिषदेकडून लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकण्यात आलेले नाहीत. याबाबत वारंवार मागणी करूनही आश्वासनाशिवाय दुसरे काहीही लाभार्थींना मिळत नाही. तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे.
काटेरी झुडपांचा वाहनधारकांना त्रास
राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० किमी रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली आहेत. रस्ता लहान, झाडे मोठी, अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. झुडपे काढण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहन चालकांनी केली आहे, परंतु याकडे लक्ष दिलेले नाही.