जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST2021-03-08T04:31:37+5:302021-03-08T04:31:37+5:30
सावता अशोक साळुंके (रा. नागापूर खु., ता. बीड) यांनी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉस्पिटलसमोर लावलेली दुचाकी ...

जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच
सावता अशोक साळुंके (रा. नागापूर खु., ता. बीड) यांनी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉस्पिटलसमोर लावलेली दुचाकी (क्र.एमएच २३ यू ७१८४) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना केज तालुक्यातील ढाकेफळ येथे घडली. येथील रहिवासी लक्ष्मण कोंडीबा नागटिळक यांनी ढाकेफळ शिवारातील लाकडी मिलसमोर दुचाकी (क्र. एमएच २३ बीए ७७४३) उभी केली होती. तिचे हॅन्डल लॉक तोडून ती अज्ञात चोरट्याने लंपास केली.
ही घटना उघडकीस आल्यानंतर युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजलगाव शहरातील गणेश राजाराम गेंदले (रा. तानाजीनगर) यांनी सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या गेटसमोर लावलेली दुचाकी (क्र. एमएच ४४ एम ८४५२) चोरून नेली. याप्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुचाकी चोरांची टोळी जेरबंद करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.