मोगरा येथून दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:40 IST2021-09-04T04:40:06+5:302021-09-04T04:40:06+5:30
----------- गुळज येथून पैशाची बॅग लांबवली गेवराई : तालुक्यातील गुळज शिवारात फायन्स कंपनीत काम करणाऱ्या नवनाथ भरत वेताळ या ...

मोगरा येथून दुचाकी लंपास
-----------
गुळज येथून पैशाची बॅग लांबवली
गेवराई : तालुक्यातील गुळज शिवारात फायन्स कंपनीत काम करणाऱ्या नवनाथ भरत वेताळ या तरुणाने दुचाकीवर (एमएच २० एक्स ०२९२) ठेवलेली पैशाची बॅग व त्यातील इतर वस्तू चोरट्यांनी हातोहात लांबवल्या. गुळज शिवारातील आंधळे यांच्या शेतानजीक १ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
--------
अर्धमसला शिवारातून विद्युत पंप लंपास
तलवाडा : गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथील बाबासाहेब कचरू थापटे यांच्या शेतात विहिरीवर बसवलेला ४५ हजार रुपयांचा विद्युत पंप चोरट्यांनी लंपास केला. २८ ते २९ ऑगस्टच्या दरम्यान ही घटना घडली. तलवाडा ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
-------
खडीक्रशरवरून २५ हजारांची तार लांबवली
गेवराई : तालुक्यातील मन्यारवाडी शिवारातील एका खडीक्रशरवरील जनरेटरच्या आर्मीचरमधील २५ किलो तांब्याची तार चोरट्यांनी चोरून नेली. १ सप्टेंबर रोजी रात्री पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी श्रीरंग मांडे (रा. गोविंदवाडी, ता. गेवराई) यांच्या फिर्यादीवरून तीन अनोळखींविरुद्ध गेवराई ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला.
-----------