गेवराईतून दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:32+5:302021-08-28T04:37:32+5:30
............... कचरा टाकण्याच्या कारणावरून मारहाण बीड : कचरा टाकण्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना परळी तालुक्यातील ...

गेवराईतून दुचाकी लंपास
...............
कचरा टाकण्याच्या कारणावरून मारहाण
बीड : कचरा टाकण्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना परळी तालुक्यातील कौडगाव घोडा येथे २५ ऑगस्ट रोजी घडली. लक्ष्मण राम सलगर असे मारहाण झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. ते शेतातून घरी येत असताना कचरा टाकण्याची कुरापत काढून त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सिरसाळा ठाण्यात अनंत दगडू कोपनर, शिवाजी कोपनर, वैजिनाथ कोपनर, दादाराव कोपनर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.........
मोबाइल देण्यावरून एकास बदडले
बीड : मी मोबाइल देणार नाही, असे म्हणल्यामुळे अंगद प्रल्हाद शिंदे या तरुणास बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना परळी तालुक्यातील लोणी येथे २५ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात वैजिनाथ नामदेव सातपुते (रा. लोणी, ता.परळी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार मुंडे करीत आहेत.
...............