शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सायगावजवळ भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 18:36 IST

सायगाव नजीक पोखरी पाटीजवळ भरधाव कारने एका दुचाकीस्वारास उडविले.

अंबाजोगाई (बीड ) : लातूर - अंबाजोगाई रोडवर बर्दापूर ते अंबासाखर कारखाना या टप्प्यात अपघातांची मालिका सुरूच असून बुधवारी सायंकाळी या ठिकाणी पुन्हा एक अपघात झाला. सायगाव नजीक पोखरी पाटीजवळ भरधाव कारने एका दुचाकीस्वारास उडविले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. नवनाथ अशोक बदाले (वय २२, रा. सोनपेठ, परभणी) असे त्या युवकाचे नाव आहे. ट्रॅक्टरचालक असलेला नवनाथ ट्रॅक्टरचे स्पेअरपार्ट खरेदीसाठी तो लातूरला गेला होता असे समजते. बुधवारी सायंकाळी ७ वाजता तो दुचाकीवरून (एमएच २२ एजी ८२६९) लातूरहून अंबाजोगाईकडे येत असताना समोरून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या अनोळखी कारने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात नवनाथ बदाले गंभीर जखमी झाला. अपघातानंतर कारचालकाने कारसह घटनास्थळाहून पळ काढला.

अपघाताचा आवाज ऐकून सायगाव येथील युवक सय्यद आमेर, सैफ मणियार, सोनू, रजीयोद्दीन यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी नवनाथला खाजगी वाहनातून अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी नवनाथची प्रकृती वरचेवर चिंताजनक होत गेली. अखेर गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातAmbajogaiअंबाजोगाई