कासारी पाटीजवळ दुचाकीस्वारास मारहाण : १२ हजारांचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:33 IST2021-05-13T04:33:53+5:302021-05-13T04:33:53+5:30

धारूर तालुक्यातील चोरांबा येथील गौतम ज्ञानोबा भालेराव हे जीप चालक असून, ते अंबाजोगाई येथील स्नेह नगरमध्ये वास्तव्यास आहेत. १० ...

Two-wheeler beaten near Kasari Pati: Rs 12,000 looted | कासारी पाटीजवळ दुचाकीस्वारास मारहाण : १२ हजारांचा ऐवज लुटला

कासारी पाटीजवळ दुचाकीस्वारास मारहाण : १२ हजारांचा ऐवज लुटला

धारूर तालुक्यातील चोरांबा येथील गौतम ज्ञानोबा भालेराव हे जीप चालक असून, ते अंबाजोगाई येथील स्नेह नगरमध्ये वास्तव्यास आहेत. १० मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास केज - धारूर रस्त्याने येत असताना पाठीमागून आलेल्या तिघांनी त्यांची दुचाकी जीपसमोर आडवी लावून भालेराव यांना थांबविले. त्यांनी तू आमच्या अंगावर का थुंकलास असे म्हणून चापटाबुक्क्याने मारहाण करून मुक्कामार दिला. त्यांच्याजवळील नगदी ५ हजार ७०० रुपये आणि ७ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा १२ हजार ७०० रुपायांचा ऐवज बळजबरीने काढून घेत तेथून पोबारा केला. भालेराव यांनी लगेच धारूर पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता हे घटनास्थळ हे केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गौतम भालेराव यांच्या फिर्यादीवरून अनोळखी तिघांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Two-wheeler beaten near Kasari Pati: Rs 12,000 looted