वाहन चोरी करणारे दोघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST2021-07-21T04:23:22+5:302021-07-21T04:23:22+5:30
बीड : जिल्ह्यात विविध ठिकाणांवरून वाहने व मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. दरम्यान, या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे ...

वाहन चोरी करणारे दोघे गजाआड
बीड : जिल्ह्यात विविध ठिकाणांवरून वाहने व मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. दरम्यान, या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना, दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २४ दुचाकी, १ चारचाकी व ७ मोबाईल जप्त केले आहेत. या कारवाईमुळे इतर घटनादेखील उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात दररोज दुचाकी व मोबाईल चोरीप्रकरणी गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे चोरटे सक्रिय असल्याचे चित्र होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणांचा तपास सुरू होता. त्यानुसार खबऱ्यांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार गेवराईवरून गढीकडे येत असताना शेख एकबाल उर्फ अप्पू शेख अहेमद व अजय बबन राठोड (दोन्ही रा. गेवराई) यांना अटक केली. त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने औरंगाबाद, जालना, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, नाशिक, कल्याण येथून २३ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोनि. भारत राऊत यांच्या पथकाने केली.
200721\20_2_bed_17_20072021_14.jpg
दुचाकी चोरटे ताब्यात घेतल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी