शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

ऊसतोड कामगारांच्या दोन चिमुकल्यांचा उकळत्या पाण्याने भाजून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 12:25 PM

माजलगाव (बीड) : शहरातील बंजारानगर भागात राहणा-या विजय जाधव याच्या घरी अंघोळीसाठी गरम करण्यासाठी ठेवलेले उकळत्या पाण्याचे भांडे पडल्यामुळे यात विजय याच्या वैभव वय 3 वर्षे  आणि वैष्णव वय 5 वर्ष या दोन चिमुकल्यांचा होरपळुन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की,विजय जाधव हा उसतोड कामगार असून तो व त्याची ...

माजलगाव (बीड) : शहरातील बंजारानगर भागात राहणा-या विजय जाधव याच्या घरी अंघोळीसाठी गरम करण्यासाठी ठेवलेले उकळत्या पाण्याचे भांडे पडल्यामुळे यात विजय याच्या वैभव वय 3 वर्षे  आणि वैष्णव वय 5 वर्ष या दोन चिमुकल्यांचा होरपळुन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की,विजय जाधव हा उसतोड कामगार असून तो व त्याची पत्नी हे ऊसतोडीसाठी गेलेले होते. त्याची दोन मुले वैभव व वैष्णव ही आजी-आजोबांसोबत माजलगाव शहरातील बंजारानगर भागात राहतात. 29 डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुलांच्या आजीने आंघोळीसाठी पाणी ठेवले होते. झोपडीवजा घर असल्यामुळे त्याच्या बाजूलाच तीन ते चार फुटांच्या अंतरावर हे दोन चिमुकले झोपलेले होते. पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले उकळते भांडे हे अचानक कळवंडल्यामुळे उकळते पाणी या दोन्ही मुलांच्या अंगावर पडले आणि ते यात चांगलेच होरपळले. घटना घडल्यानंतर आजी आजोबांनी एकच आरडाओरडा केला, त्यानंतर सदर मुलांना दवाखान्यात हलविण्यात आले. परंतु दोन्ही मुलांच्या अंगावरील कातडी गरम पाण्यामुळे पार सोलून निघाल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलविण्यात आले. दोघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना लातूर येथे रुग्णालयात नेण्यात आले. येथेच उपचारादरम्यान दोन्ही मुलांचा करुण अंत झाला. अठराविश्व दारिद्र्य असलेल्या वैभव आणि वैष्णव यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. यातच त्यांच्या दोन्ही मुलांचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कठीण परिस्थितीत जीवन जगणा-या जाधव याच्यावर कोसळलेल्या या दुःखामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. परिवाराला आर्थिक मदतीची गरज अत्यंत तुटपुंज्या उत्पन्नावर विजय हा आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवत असे. त्यातच दोन मुलांचा करुण अंत झाल्यामुळे आता त्या मुलांच्या उत्तर कार्यासाठी देखील विजयला मोठा आर्थिक संघर्ष करावा लागणार आहे. आता या परिवाराला समाजातील सेवाभावी लोकांनी तसेच दानशूरांनी पुढे येऊन मदत केली, तरच त्याचा तात्पुरता चरितार्थ पुढे चालू शकतो. 

टॅग्स :Beedबीड