संघर्ष धान्य बँकेकडून वृध्दाश्रमास दोन क्विंटल धान्याची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST2021-03-13T04:58:51+5:302021-03-13T04:58:51+5:30
कळसंबर नेकनूर येथील आपला परिवार अनाथाश्रमात मनीषा पवार या १० वृद्धांचा सांभाळ करतात. स्वतःची जमीन वृद्धाश्रामास दान करून या ...

संघर्ष धान्य बँकेकडून वृध्दाश्रमास दोन क्विंटल धान्याची मदत
कळसंबर नेकनूर येथील आपला परिवार अनाथाश्रमात मनीषा पवार या १० वृद्धांचा सांभाळ करतात. स्वतःची जमीन वृद्धाश्रामास दान करून या वृद्ध अनाथांचा त्या सांभाळ करतात. लॉकडाऊनमुळे अनाथश्रमात मदतीची आवक कमी आहे. त्यामुळे मदतीची गरज असल्यामुळे गेवराई येथील संघर्ष सामाजिक धान्य बँकेने या आश्रमास दोन क्विंटल धान्याची मदत केली आहे. संघर्ष सामाजिक धान्य बँक गत तीन वर्षांपासून बीड जिल्ह्यातील अनाथ आश्राम, गोरगरीब अनाथ वंचित घटकांसाठी धान्य पुरवण्याचे काम करते. आतापर्यंत १०० क्विंटल धान्य वाटप केले आहे .या बँकेमध्ये सर्व शिक्षक काम करत आहेत. याप्रसंगी बालाजी मारगुडे, धान्य बँकेचे संचालक शिवाजी झेंडेकर, संजय पांढरे, आपला परिवारची संचालिका मनीषा पवार, वैजीनाथ खोडके, नामदेव चौधर, डोरले, सुरेखा पांडव, गणेश पांडव उपस्थित होते.
===Photopath===
120321\12bed_2_12032021_14.jpg
===Caption===
गेवराई येथील संघर्ष धान्य बँकेकडून कळसंबर येथील वृद्धाश्रमाला दोन क्विंवटल धान्याची मदत देण्यात आली.