शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चोरी करणारे दोघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:40 IST

शहरातील रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाची चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन संशयितांना डी. बी. पथकाने गुरुवारी पहाटे रंगेहाथ पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाची चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन संशयितांना डी. बी. पथकाने गुरुवारी पहाटे रंगेहाथ पकडले. ही कारवाई शहरातील बालेपीर भागात क रण्यात आली. दोन्ही संशयित पुणे, रायगडचे आहेत. सोमनाथ लक्ष्मण पंडिकोडे (२८, रा. सोमठाणा फाटा, तळेगाव, पुणे) व विजय मारोती शिंदे (३९, रा. कामोठे, ता. पनवेल जि. रायगड) अशी त्या संशयितांची नावे आहेत.बीड शहरात रात्रीच्या वेळी गैरप्रकर होऊ नयेत यासाठी गस्त घातली जाते. शहरातील बालेपीर भागात डी.बी. पथकाचे कर्मचारी गुरुवारी पहाटे गस्त घालत होते. त्याचवेळी बालेपीर भागातील दर्गाजवळ राहणारे शेख चांद यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या मालवाहू जीप (क्र.एमएच २८ एबी-४१३६) चा दरवजा यावेळी सोमनाथ पंडिकोडे हा एका चावीच्या सहाय्याने उघडण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी गस्तीवरील पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाठल्या, थोडा वेळ निरीक्षक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे धाव घेतली.यावेळी जवळच उभ्या असलेल्या ट्रकच्या मागे विजय शिंदे हा लपलेला आढळला. पोलिसांना पाहून दोघांनीही तेथून पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. व पोलीस ठाण्यात घेऊन गेले.ही कारवाई डी.बी. पथकाचे सहायक फौजदार शेख जहूर, पो.ना. महेश जोगदंड, गोलू पठाण, पोकॉ. राहुल पाईकराव, बप्पासाहेब सारणीकर, चालक राहुल मस्के यांनी केली. या प्रकरणी शेख चांद यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :ThiefचोरCrime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीस