परळीत दोन गुन्ह्यात युवकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:32 IST2018-01-06T00:32:45+5:302018-01-06T00:32:49+5:30
परळी (जि. बीड) येथील शिवसेना तालुका प्रमुख वैजनाथ सोळंके यांची कार जाळल्याच्या आरोपावरून पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी स्वप्नील शंकर साळवे, (२१, रा.जगतकर गल्ली परळी) यास अटक केली.

परळीत दोन गुन्ह्यात युवकास अटक
परळी (जि. बीड) : येथील शिवसेना तालुका प्रमुख वैजनाथ सोळंके यांची कार जाळल्याच्या आरोपावरून पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी स्वप्नील शंकर साळवे, (२१, रा.जगतकर गल्ली परळी) यास अटक केली.
वैजनाथ सोळंके यांची बुधवारी रात्री अकराच्या सुमारास कार जाळली होती. या प्रकरणातही शहर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. परळी - घाटनांदूर रेल्वे मार्गावरील रु ळावर बुधवारी दुपारी रेल्वेचे सिमेंट स्लीपर टाकून घातपात केल्याच्या प्रकरणातही तोच आरोपी आहे. यावरुन गुरुवारी स्वप्नीलला परळी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यास शुक्रवारी सायंकाळी अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दोन दिवसांपूर्वी रेल्वे लाईनवर टाकलेले सिमेंट स्लीपर हे २४० किलो वजनाचे असून हे काम एकट्याचे नसून सामूहिक असावे, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे. अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची चौकशी सुरू आहे