शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केज तालुक्यातून पुन्हा दोन मुली बेपत्ता; १४ वर्षांच्या मुलीसह १८ वर्षांच्या तरुणीचे अपहरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:21 IST

केजमध्ये मुलींच्या बेपत्ता होण्याचे सत्र सुरूच! तुकुचीवाडी आणि बोबडेवाडीतील घटना; पोलिसांकडून तपास सुरू

केज (जि. बीड): केज तालुक्यातून दोन वेगवेगळ्या गावांतील दोन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये एक १४ वर्षांची अल्पवयीन मुलगी असून दुसरी १९ वर्षांची तरुणी आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका तरुणीने आंतरजातीय विवाह केल्याचेही आता समोर आले आहे.

पहिली घटना: मध्यरात्री मुलगी गायबतुकुचीवाडी येथील इयत्ता ८ वीत शिकणारी १४ वर्षांची मुलगी बुधवारी (११ मार्च) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आईजवळ झोपलेली होती. तिचे वडील शेतातून घरी परतले असता मुलगी घरात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना: मजुरीचे पैसे देण्यासाठी गेली अन्...बोबडेवाडी येथील १९ वर्षीय तरुणी २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी मजुरांचे पैसे देण्यासाठी गावात गेली होती, ती अद्याप घरी परतलेली नाही. नुकतीच बारावीची परीक्षा दिलेल्या या तरुणीचा सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नाही. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

आंतरजातीय विवाहाचा उलगडासहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलींपैकी योगेश्वरी कोठावळे हिने भावठाणा येथील अभिषेक कापसे या तरुणासोबत आळंदी येथे राजीखुशीने आंतरजातीय विवाह केला आहे. ती सध्या सुखाने नांदत असल्याची माहिती अभिषेकचे वडील विलास कापसे यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय उमेश निकम या प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Two Girls Missing Again in Kej Taluka; Suspected Abduction

Web Summary : Two girls, 14 and 19, are missing from Kej Taluka, Beed, sparking concern. One eloped and married someone from a different caste. Police are investigating.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारी