आणखी दोन मृत्यू, २६६ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:33 IST2021-03-18T04:33:49+5:302021-03-18T04:33:49+5:30
यामध्ये २,०९७ अहवाल निगेटिव्ह आले तर २६६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात अंबाजोगाई ६०, आष्टी ९, बीड १००, धारुर ...

आणखी दोन मृत्यू, २६६ नवे रुग्ण
यामध्ये २,०९७ अहवाल निगेटिव्ह आले तर २६६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात अंबाजोगाई ६०, आष्टी ९, बीड १००, धारुर ४, केज ८, गेवराई १८, माजलगाव ३५, परळी १५, पाटोदा ९, शिरुर ४, वडवणी ४ येथील रुग्णांचा समावेश आहे. तसेच दोघांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. यात गेवराई शहरातील जुना बसस्थानकाजवळील ८७ वर्षीय पुरुष व केज तालुक्यातील कुंबेफळ येथील ३९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. ८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आता एकूण बाधितांची संख्या २१ हजार २२४ एवढी झाली आहे. पैकी १९ हजार ४६९ कोरोनामुक्त झाले असून ५९७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.