दुचाकींच्या धडकेत दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:37+5:302021-08-28T04:37:37+5:30
माजलगाव - तेलगाव रस्त्यावरील घटना माजलगाव : दोन दुचाकींच्या झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी ...

दुचाकींच्या धडकेत दोघांचा मृत्यू
माजलगाव - तेलगाव रस्त्यावरील घटना
माजलगाव : दोन दुचाकींच्या झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास माजलगाव तेलगाव रोडवरील रिलायन्स पेट्रोलपंपासमोर घडली.
अरुण जगन्नाथ शेजूळ (वय ६५ रा. आबेगाव), नंदकुमार संतराम मायकर (वय ३८, रा. शिंदेवाडी) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अरुण शेजूळ हे माजलगाव हून खामगाव पंढरपूर महामार्गावरून शेतात जात होते. रिलायन्स पंपाजवळ आल्यानंतर त्यांनी अचानक गाडी वळवली. यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या नंदकुमार मायकर यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली. दुचाकीवरून दोघेही रस्त्यावर पडले. रस्त्यावर पडल्याने दोघांच्याही डोक्याला मार लागल्याने गंभीररीत्या जखमी झाले. उपचारासाठी दोघांनाही माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. अरुण शेजूळ हे जलसंपदा विभागात अभियंता होते. दोन वर्षापासून ते निवृत्त झाल्याने शेती व्यवसाय करत होते.
270821\purusttam karva_img-20210827-wa0038_14.jpg