दुचाकीच्या धडकेत दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST2021-06-27T04:22:09+5:302021-06-27T04:22:09+5:30
बीड : रामनगर येथील आरटीओ कार्यालयाकडून विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुचाकीला बीडवरून गेवराईकडे जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने ...

दुचाकीच्या धडकेत दोघांचा मृत्यू
बीड : रामनगर येथील आरटीओ कार्यालयाकडून विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुचाकीला बीडवरून गेवराईकडे जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर बुलेटवरील पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ११:३० वाजण्याच्या दरम्यान घडली.
तुकाराम सूर्यभान जगताप (वय ४७) व दत्ताभाऊ भानुदास शिंदे (वय २८) (दोघे रा. भवानवाडी) हे शुक्रवारी रात्री ११:३० वाजण्याच्या दरम्यान दुचाकी (क्र.एम.एच. २३ बी.ए. २८९८) वरून नामलगावकडून बीडकडे राँग साईडने येत होते. यावेळी महामार्ग पोलीस म्हणून कार्यरत असलेले अजय जाधव हे बीडवरून गेवराईकडे दुचाकीवरून (क्र. एम.एच.२३ एएम २२१४ ) जात होते. त्यावेळी आरटीओ ऑफिसजवळ भरधाव वेगातील दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तुकाराम जगताप आणि दत्ता भाऊ शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील पोलीस कर्मचारी अजय जाधव हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही मयताचे शनिवारी दुपारी उशिरा शवविच्छेदन करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश उबाळे, बिट अंमलदार उद्धव जरे यांनी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
===Photopath===
260621\26_2_bed_7_26062021_14.jpeg
===Caption===
अपघातातील मयताची दुचाकी