शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

दोन जीपची समोरासमोर धडक, दीर-भावजय जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 09:08 IST

Acciden at Beed : दोन वर्षांच्या बाळासह वडील बालंबाल बचावले

बीड: तापेने फणफणलेल्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन दवाखान्यात निघालेल्या जीपला मालवाहू जीपने समोरासमोर जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दीर- भावजय जागीच ठार झाले तर दोन वर्षांच्या बाळासह त्याचे वडील बालंबाल बचावले.बीड-परळी मार्गावरील जरूड फाट्यावर १४ सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

रवि नागोराव मिटकर (२६), सोनाली माधव मिटकर (३०) अशी मयत दीर- भावजयीची नावे आहेत. चालक विशाल अर्जुन मिटकर (२७) हा जखमी असून गौरव माधव मिटकर (२) आणि माधव नागोराव मिटकर (३५) हे थोडक्यात वाचले. घाटसावळी तांडा (ता.बीड) येथील रहिवासी असलेल्या मिटकर कुटुंबातील गौरवला रात्री ताप आला. त्यामुळे पहाटे ३ वाजता त्याला घेऊन कुटुंबीय बीडकडे जीपमधून (एमएच ०६ एएस - ०४६७) बीडला निघाले होते तर भूम (जि. उस्मानाबाद) येथून परळीकडे भाजीपाला घेऊन मालवाहू जीप (एमएच २५ एजे- ३४०३) जात होती.बीड- परळी मार्गावर जरूड फाट्यानजीक मालवाहू जीपचालकाचा ताबा सुटला आणि समोरासमोर जोराची धडक झाली.

यानंतर जीप शंभर दीडशे मीटरवर जाऊन उलटली. यात रवि मिटकर व सोनाली मिटकर हे जागीच मृत्युमुखी पडले तर चालक अर्जुन मिटकर हा जखमी झाला. गौरव आणि त्याचे वडील माधव हे अपघातानंतर जीपमधून बाहेर झेपावले. त्यामुळे ते सुरक्षित आहेत. अपघातात जीपचा अक्षरशः चुराडा झाला असून मालवाहू जीपचे देखील नुकसान झाले. पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.स्थानिकांचे मदतकार्यदोन जीपची समोरसमोर धडक झाल्यावर मोठा आवाज झाला. या आवाजाने किशोर काकडे व जालिंदर काकडे धावत आले. त्यानंतर दादासाहेब लांडे यांनी देखील तेथे पोहोचून मदतकार्य केले. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मालवाहू जीपचालकास त्यांनी पिंपळनेर पोलिसांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू