लोणीत दोन गटात तुंबळ हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:33 IST2021-04-21T04:33:48+5:302021-04-21T04:33:48+5:30

बीड : शिरूर कासार तालुक्यातील लोणी गावात क्षुल्लक कारणावरून दोन गटात तुंबळ मारहाण झाली. ही घटना १९ एप्रिल रोजी ...

Two groups fight over butter | लोणीत दोन गटात तुंबळ हाणामारी

लोणीत दोन गटात तुंबळ हाणामारी

बीड : शिरूर कासार तालुक्यातील लोणी गावात क्षुल्लक कारणावरून दोन गटात तुंबळ मारहाण झाली. ही घटना १९ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या गुन्ह्यात गणेश नानासाहेब बडे यांच्या फिर्यादीवरून ते लोणी येथील मंदिरासमोर उभा होते. यावेळी नंदलाल बडे व त्यांच्यासोबत अन्य दोघेजण त्याठिकाणी आले. ‘आमच्या घराकडे जाण्यासाठी रस्ता लागेल रस्ता सोडून दे’ अशी भांडणाची कुरापत काढून त्यांना टॉमीने मारहाण करण्यात आली. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात नंदलाल बडे, परशुराम हंगे, नाना वीर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याच प्रकरणात परस्परविरोधी गुन्हा नंदलाल बबन बडे यांनी दाखल केला असून, त्यांच्या फिर्यादीवरून ते त्यांच्या शेतात काम करीत होते. यावेळी गणेश नाना बडे यांना ते म्हणाले ‘माझ्या शेतात पत्रे टाकू नका’ या कारणावरून नंदलाल बडे यांना चौघांनी मिळून मारहाण केली. याप्रकरणी शिरुर कासार ठाण्यात गणेश नाना बडे, सुमन बडे, नाना बडे, दीपक बडे या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two groups fight over butter