पूर्ववैमनस्यातून दोन गट समोरासमोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:35 IST2021-08-26T04:35:57+5:302021-08-26T04:35:57+5:30
अंबाजोगाई : जुन्या वादाच्या कारणावरुन शहरात जुन्या वादातून दोन गट समोरासमोर आले. यावेळी जोरदार हाणामारी झाली. परस्परविरोधी ...

पूर्ववैमनस्यातून दोन गट समोरासमोर
अंबाजोगाई : जुन्या वादाच्या कारणावरुन शहरात जुन्या वादातून दोन गट समोरासमोर आले. यावेळी जोरदार हाणामारी झाली. परस्परविरोधी तक्रारीवरून १४ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
ज्योती विद्यासागर गायकवाड (३२, रा. मिलिंदनगर) यांच्या तक्रारीनुसार, जुन्या वादाची कुरापत काढून नंदिनी भगवान गायकवाड, रवी प्रकाश गायकवाड, स्वाती राजू भोसले, दीपा रामदास साळवे, वनिता संतोष नेरे, रामदास साळवे (सर्व रा. मिलिंदनगर) यांनी घरात घुसून ज्योती यांच्या मुलीला शिवीगाळ करुन मारहाण केली.
तर नंदिनी भगवान गायकवाड यांच्या तक्रारीनुसार, जुन्या वादातून जयश्री कोकाटे, रूपेश कोकाटे, रमेश कांबळे, रोहन कोकाटे, सागर गायकवाड, विजय कांबळे, धनवती कांबळे, ज्योती सागर गायकवाड (सर्व रा. मिलिंदनगर) यांनी मारहाण केली.
--------