क्षुल्लक कारणावरून दोन गट भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:40 IST2021-09-04T04:40:12+5:302021-09-04T04:40:12+5:30
बीड : पाटोदा तालुक्यातील उखंडा येथे क्षुल्लक कारणावरून दोन गट ३० ऑगस्ट रोजी आमनेसामने आले. यावेळी काठी व विळ्याने ...

क्षुल्लक कारणावरून दोन गट भिडले
बीड : पाटोदा तालुक्यातील उखंडा येथे क्षुल्लक कारणावरून दोन गट ३० ऑगस्ट रोजी आमनेसामने आले. यावेळी काठी व विळ्याने एकमेकांवर हल्ला चढविण्यात आला. परस्परविरोधी तक्रारीवरून आठजणांवर गुन्हा नोंद झाला. आरोपींत एका शिक्षकाचा समावेश आहे.
बाबासाहेब नरहरी अडाळे (रा. उखंडा) हे गावाजवळील आडाळे वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. घरासमोर दारूच्या नशेत दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांना विनाकारण काठीने मारहाण करून डोके फोडले. विकास गणपत बजगुडे, नितीन गणपत बजगुडे, गणपत किसन बजगुडे, संतोष गणपत बजगुडे (सर्व, रा. निरगुडी, ता. पाटोदा) यांच्यावर पाटोदा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, विकास बजगुडे यांच्या तक्रारीनुसार, रस्त्यात काड्या का टाकल्या, असे विचारल्याच्या कारणावरून विळ्याने मानेवर हल्ला केला. वडिलास दगडाने, तर भावास काठीने मारहाण करण्यात आली. यावरून शिक्षक बाबासाहेब आडाळे, उद्धव आडाळे, भीमा आडाळे, अर्जुन आडाळे यांच्यावर पाटोदा ठाण्यात गुन्हा नोंद झाला.