मोमीनपुऱ्यात दोन गट भिडले, १८ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:36 IST2021-09-25T04:36:35+5:302021-09-25T04:36:35+5:30

बीड : जागेच्या किरायावरून शहरातील मोमीनपुरा येथे दोन गटांतील वाद विकोपाला गेला. यावेळी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २२ सप्टेंबर ...

Two groups clash in Mominpur, 18 charged | मोमीनपुऱ्यात दोन गट भिडले, १८ जणांवर गुन्हा

मोमीनपुऱ्यात दोन गट भिडले, १८ जणांवर गुन्हा

बीड : जागेच्या किरायावरून शहरातील मोमीनपुरा येथे दोन गटांतील वाद विकोपाला गेला. यावेळी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता घडली. चाकू, लोखंडी रॉड व लाकडी दांड्यांचा हाणामारीत सर्रास वापर करण्यात आला. परस्परविरोधी तक्रारींवरून १८ जणांवर पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

मोमीन सईद मोमीन जहीर (रा. मक्काचौक, मोमीनपुरा) यांच्या तक्रारीनुसार, २२ रोजी सायंकाळी सात वाजता तू खूप भाडे मागतो, तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत चाकूने हल्ला चढविला. त्यानंतर लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारहाण केली. शिवाय गळ्यावर पाय देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. समीर सौदागर, इम्रान सौदागर, असलमान सौदागर, अखतर सौदागर, रफिक सौदागर, रेहान सौदागर, मोसीन सौदागर, सामेर सौदागर, बाबू सौदागर, कलीम सौदागर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. दुसऱ्या गटातर्फे महंमद इम्रान महंमद रफिक यांच्या तक्रारीवरुन, ९ जणांवर गुन्हा नोंद झाला. चाकूने वार करण्याचा प्रयत्न झाला. शिवाय लाकडी दांड्याने मारहाण केली. यावेळी त्यांच्या आईलाही मारहाण करण्यात आली. मोमीन सईद मोमन जहीर, मोमीन फसियोद्दीन मोमीन रियाजोद्दीन, मोमीन फइमोद्दीन महंमद शरीफ, मोमीन महंमद जहर महंमद शरीक, मोमीन फदिरोद्दीन मोमीन फयिदोद्दीन, मोमीन आमेर मोमीन फइदोद्दीन, मोमीन समीर मोमीन जहिरोद्दीन, मोमीन अझहर मोमीन फइमोद्दीन, मोमीन राजा यांच्यावर गुन्हा नोंद झाला.

....

चार जण अटकेत

एका गटातील एक, तर दुसऱ्या गटातील तीन, अशा एकूण चार आरोपींना २३ सप्टेंबर रोजी पेठ बीड पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला, अशी माहिती पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली.

.....

Web Title: Two groups clash in Mominpur, 18 charged