Two goondas from Gevarai expatriates from Beed district | गेवराईचे दोन गुंड बीड जिल्ह्यातून हद्दपार

गेवराईचे दोन गुंड बीड जिल्ह्यातून हद्दपार

बीड : गंभीर गुन्हे करून शहरासह तालुक्यात दहशत माजविणाऱ्या अट्टल दोन गुंडांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी बुधवारी केली.

संजय व विजय निवृत्ती सुतार (रा.गेवराई) असे हद्दपार केलेल्या गुंडांची नावे आहेत. दोघांविरूध्द गेवराई शहर व तालुक्यात मारामारी, जीवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे व धमक्या देणे असे गुन्हे दाखल असून या गुन्ह्यात त्यांना अटक करूनही त्यांच्यात बदल होत नव्हता. त्यामुळे गेवराईचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी या दोघांविरूध्द हद्दपारीचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर केला होता.

उपअधीक्षक अर्जुन भोसले यांनी प्रस्तावावर चौकशी करून दोन वषार्साठी दोघांना हद्दपार करण्याची शिफारस अधीक्षकांकडे केली होती. त्यानंतर बुधवारी अधीक्षक जी.श्रीधर यांनी दोघांनाही एक वषार्साठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
 

Web Title: Two goondas from Gevarai expatriates from Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.