२ लाख १४ हजार चिमुकल्यांना दोन थेंब जीवनाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST2021-02-05T08:25:05+5:302021-02-05T08:25:05+5:30

पल्स पोलिओ माेहीम : आरोग्य विभागाचे नियेाजन, बूथ, मोबाईल पथकाचीही नियुक्ती बीड : कोरोना लसीकरणामुळे १७ जानेवारीची पल्स पोलिओ ...

Two drops of life to 2 lakh 14 thousand Chimukals | २ लाख १४ हजार चिमुकल्यांना दोन थेंब जीवनाचे

२ लाख १४ हजार चिमुकल्यांना दोन थेंब जीवनाचे

पल्स पोलिओ माेहीम : आरोग्य विभागाचे नियेाजन, बूथ, मोबाईल पथकाचीही नियुक्ती

बीड : कोरोना लसीकरणामुळे १७ जानेवारीची पल्स पोलिओ माेहीम ३१ जानेवारीला होत आहे. जिल्ह्यात ० ते ५ वर्षे वयोगटातील २ लाख १४ हजार ८८ चिमुकल्यांना ‘दोन थेंब जीवना’चे दिले जाणार आहेत. यासाठी बूथ, मोबाईल पथक, ट्रांझिट टीमचेही नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या २६ लाख ८४ हजार ८८९ एवढी आहे. या सर्वांचे सर्वेक्षण केले असता जिल्ह्यात ० ते ५ वर्षे वयोगटातील २ लाख १४ हजार ८८ लाभार्थी निघाले. त्यांना पोलिओ डोस देण्यासाठी आरोग्य विभागाने नियाेजन केले असून तयारी अंतीम टप्यात आहे. याबाबत जिल्हा, तालुका व आरोग्य केंद्रास्तरावर प्रशिक्षणही देण्यात आले आहे. वाड्या, वस्त्या, बांधकामाचे ठिकाण, उसतोडणी कामगार, रस्ते यासह जे स्थलांतरीत झाले आहेत, अशांची माहिती संकलीत केली आहे. स्थलांतरीत लाभार्थ्यांची यादी संबंधित जिल्ह्यातील आरोग्य विभागाला पाठवून त्यांना पाेलीओ डोस देण्याचे नियोजनही आरोग्य विभागाने केले आहे. आता ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करून आपल्या चिमुकल्यांना पोलीओमुक्त ठेवण्यासाठी दोन थेंब द्यावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्ोधिकारी डाॅ. आर. बी. पवार यांनी केले आहे.

कोट - फोटो

जिल्ह्याला ३ लाख ६६ हजार पोलीस डोस प्राप्त झाले असून ० ते ५ वर्षे वयोगटातील २ लाख १४ हजार ८८ लाभार्थी आहेत. ३१ जानेवारीला ही मोहीम असेल. प्रत्येकाने आपल्या पाल्याला हा डोस द्यावा. यापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली आहे. तसे नियोजन केले आहे. जनजागृतीही केली असून पालकांनी सहकार्य करावे.

डॉ. आर. बी. पवार

जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

अशी आहे आकडेवारी

जिल्ह्याची लोकसंख्यात - २६८४८८९

लाभार्थी - २१४०८८

पोलिओ डोस प्राप्त - ३६६०००

एकूण बूथ - २३५७

आरोग्य सेवक - ५९७१

पर्यवेक्षक - ९९९

आरोग्य संस्था - ६७

मोबाईल पथक - १५२

ट्रांझिट पथक - १०९

वेळ - सकाळी ८ ते सायं. ५ वाजेपर्यंत

Web Title: Two drops of life to 2 lakh 14 thousand Chimukals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.