जिल्ह्यात अत्याचाराचे दोन गुन्हे - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST2021-07-05T04:21:02+5:302021-07-05T04:21:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : येथील जिल्हा रुग्णालयात कंत्राटावर असलेल्या एका नर्सवर अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री ...

जिल्ह्यात अत्याचाराचे दोन गुन्हे - A
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील जिल्हा रुग्णालयात कंत्राटावर असलेल्या एका नर्सवर अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. तर परळी शहरात राहणाऱ्या मेहुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडच्या जिल्हा रुग्णालयात कंत्राटी नर्स म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेवर अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी पुरुषोत्तम मस्के या तरुणाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी अत्याचाराची घटना परळी शहरातील थर्मल कॉलनी भागात घडली. या घटनेतील आरोपी हा आपल्या मेहुणीला भेटण्यासाठी आला होता. त्याने मेहुणीला पिण्यासाठी ज्यूस आणला होता. त्या ज्यूसमध्ये गुंगीचे औषध टाकून त्याने मेहुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून त्याच्या विरोधात संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.