आष्टी तालुक्यात दोन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:36 IST2021-08-19T04:36:41+5:302021-08-19T04:36:41+5:30

टाकळी अमिया येथील शिक्षक रमेश देवराव तळेकर हे सोमवारी दुपारच्या चार सव्वाचार वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी ...

Two burglary cases in Ashti taluka | आष्टी तालुक्यात दोन घरफोड्या

आष्टी तालुक्यात दोन घरफोड्या

टाकळी अमिया येथील शिक्षक रमेश देवराव तळेकर हे सोमवारी दुपारच्या चार सव्वाचार वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी राहत्या घराचे दार तोडून कपाटाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. १ लाख ७२ हजार ४३८ रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. मंगळवारी रमेश तळेकर यांच्या फिर्यादीवरून आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक भरत मोरे करीत आहेत. दुसरी घटना अंभोरा ठाणे हद्दीतील सुलेमान देवळा येथे घडली. येथील भाऊसाहेब घोडके हे सोमवारी शेतात काम करत होते, तर मुलगा कामावर गेला होता. घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. पेटीतील सोने व रोख असा एकूण १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. अंभोरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार डी.व्ही. टकले करीत आहेत. या घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

180821\18bed_6_18082021_14.jpg

चोरी

Web Title: Two burglary cases in Ashti taluka