बीडमध्ये पुन्हा दोन चो-या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:51 IST2017-12-21T00:50:37+5:302017-12-21T00:51:55+5:30
बीड शहरातील सारडा नगरीत चरखा, कुलकर्णी व देशपांडे तर विद्यानगर भागात अमृता सक्सेना यांच्या घरी चोरी करून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला होता. याचा तपास सुरू असतानाच बुधवारी रात्री मोंढा भागात दोन दुकाने फोडून हजारोंचा ऐवज लंपास केला.

बीडमध्ये पुन्हा दोन चो-या
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील सारडा नगरीत चरखा, कुलकर्णी व देशपांडे तर विद्यानगर भागात अमृता सक्सेना यांच्या घरी चोरी करून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला होता. याचा तपास सुरू असतानाच बुधवारी रात्री मोंढा भागात दोन दुकाने फोडून हजारोंचा ऐवज लंपास केला.
दोन दिवसांपासून चोरीचे सत्र सुरूच असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी परिसिरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून यामध्ये एक चोर कैद झाला आहे.
घाडगे दाम्पत्य हत्या प्रकरणानंतर आणि अगोदर चोरट्यांनी जिल्ह्यात धुमाकुळ घातला होता. त्यानंतर पोलिसांची दोन ते तीन टोळ्या जेरबंद करून चोºयांचे सत्र थांबविले होते. त्यानंतर दोन महिने जिल्ह्यात किरकोळ घटना वगळता शांतता होती. परंतु दोन दिवसांपूर्वी अंभोरा येथील दरोडा आणि सोमवारी रात्री बीड शहरात एकाच रात्री झालेल्या चार चोºयांनी खळबळ उडाली आहे.
याचा तपास लावण्यात पोलीस व्यस्त असतानाच मोंढा भागातील सतीष डुंगरवाल यांच्या मालकीचे किराणा दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानातील रोख २० हजार रुपये व सीसीटीव्ही कॅमेरे लंपास केले. त्यानंतर त्यांच्याच समोर असलेले अभिनंदन कांकरीया यांच्या साखर व पेंडच्या दुकानातही चोरी झाली. यामध्ये किती ऐवज लंपास केला, याची नोंद नसल्याचे पेठबीड पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या दोन्ही घटनांनी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पंचनामा केला आहे. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले होते. या घटनांची पेठबीड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
कारमधून आले होते चोरटे
डुंगरवाल यांच्या बाजूच्याच दुकानातील एका कॅमेºयात हा सर्व प्रकार कैद झाला आहे. कारमधून आलेल्या तीन चोरट्यांनी डुंगरवाल यांच्या दुकानाचे शटर वाकवून ऐवज लंपास केला.
शटर उघडण्यापूर्वी एक चोरटा कोणी आले का? ही पाहण्यासाठी बाजूला आला असता तो कॅमे-यात कैद झाला. परंतु अंधार असल्याने चेहरा दिसत नाही. त्याने पूर्ण चेहरा बांधलेला होता. त्यामुळे त्याला ओळखण्यास अडचणी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.