शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिवटे प्रकरणात ट्विस्ट : आधी समाधान मुंडेला झाली मारहाण,  मग बदल्यासाठी दिवटेला बदडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 15:12 IST

परळीत गुन्हा दाखल होणार, प्रकरणाला जातीय रंग देऊ नये : पोलिस

बीड : परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. दिवटेला मारहाण करताना दिसणाऱ्या लांब केस असलेल्या समाधान मुंडे या तरुणाला आधी बेदम मारहाण झाली होती. त्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. याप्रकरणात परळीमध्ये गुन्हा दाखलची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. आधी मारहाण झाल्याने बदला घेण्यासाठीच दिवटेला मारहाण केल्याचे सांगण्यात येते. तर दुसऱ्या बाजूला या घटनेला जातीय रंग देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले.

१६ मे रोजी परळीतील जलालपूर येथे सप्ताहाचा कार्यक्रम होता. त्यासाठी शिवराज दिवटे (१८ रा.लिंबोटी ता.परळी) हा मित्रांसोबत गेला होता. तेथे किरकोळ कारणावरून वाद झाल्याने त्याचे अपहरण करून डाेंगरात नेत रिंगण करून बेदम मारहाण झाली. त्यानंतर पायाही पडायला लावले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शिवराजच्या जबाबावरून २० जणांवर गुन्हा दाखल झाला असून ७ जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यानंतर आता जलालपूरमध्ये समाधानलाही मारहाण झाल्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. त्याआधारे तक्रार घेऊन मारहाण करणाऱ्या जमावाविरोधात परळीत गुन्हा दाखल केला जाणार आहे.

गुन्हेगाराला जात नसते दिवटे प्रकरणात काही लोकांनी आरोपींच्या आडनावावरून जातीय उल्लेख करत सोशल मीडियावर वादंग उठवले आहे.  गुन्हेगारांना जात नसते. कोणीही असे प्रकार करून करिअर खराब करून घेऊ नये. असे काही घडत असेल तर पोलिसांना कळवा. वादग्रस्त पोस्ट करू नये, अन्यथा गुन्हा दाखल करू, असा इशारा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे.

दिवटे प्रकरणात गुन्हा दाखल आहे. त्यात दोन अल्पवयीनसह सात आरोपी ताब्यात आहेत. आता समाधान मुंडे नावाच्या तरुणालाही मारहाण झाल्याचा व्हिडीओ आला आहे. त्यातही तक्रार येताच गुन्हा दाखल केला जाईल.  नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस