हात-पाय बांधून मारहाण करीत वीस ते पंचेवीस शेळ्या केल्या लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST2021-07-01T04:23:39+5:302021-07-01T04:23:39+5:30

धारूर : धारूर तालुक्यातील चोरंबा येथील मुलीसह वडिलांचे हात-पाय बांधून मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री आरणवाडी फाट्याजवळ घडली. ...

Twenty to twenty-five goats with their hands and feet tied and beaten | हात-पाय बांधून मारहाण करीत वीस ते पंचेवीस शेळ्या केल्या लंपास

हात-पाय बांधून मारहाण करीत वीस ते पंचेवीस शेळ्या केल्या लंपास

धारूर : धारूर तालुक्यातील चोरंबा येथील मुलीसह वडिलांचे हात-पाय बांधून मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री आरणवाडी फाट्याजवळ घडली. ४ ते ५ जणांनी मारहाण करत २० ते २५ शेळ्या पळवून नेल्याची घटना चोरंबा येथे घडली.

याप्रकरणी बुधवारी दुपारी उशिरापर्यंत धारुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला नव्हता. धारुर तालुक्यातील चोरांबा येथील अर्जुन डोंगरे (वय ८० वर्षे) व त्यांची मुलगी कौशल्या अभिमान भालेराव हे आरणवाडी फाटा येथील शेतामध्ये राहतात. मंगळवारी मध्यरात्री अज्ञात ४ ते ५ जणांनी कौशल्या भालेरावसह वडिलांचे हात-पाय बांधून बेदम मारहाण केली. यात बापलेक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे डोंगरे कुटुंब प्रचंड दहशतीखाली आहे. या घटनेमुळे परिसरातील वस्त्यावरील लोकही भीतीखाली वावरत आहेत.

सदरील या घटनेनंतर धारूर पोलीस स्टेशन येथे कौशल्या भालेराव यांनी धाव घेतली. याप्रकरणी चोरट्याविरोधात धारूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

===Photopath===

300621\img-20210630-wa0166.jpg

===Caption===

ज्याचे शेळ्या हात पाय बांधून नेल्या ती मुलागी व वडील

Web Title: Twenty to twenty-five goats with their hands and feet tied and beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.