शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

थेट अमेरिकेतून ट्वीट, पंकजांनी निकालापूर्वीच फडकावले पांढरे निशाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 15:48 IST

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी शनिवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या

बीड/मुंबई - बीड जिल्हा परिषद निवडणुकीत निवडणुकांपूर्वीच पंकजा मुंडेंनी आपला पराभव मान्य केल्याचं त्यांच्या ट्विट वरुन दिसून येतंय. पंकजा मुंडेंनी ट्विट करुन जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकांचे निकाल स्पष्ट असल्याचं सांगितलंय. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर पंकजा नाराज होत्या, अशा बातम्याही माध्यमात आल्या आहेत. तर, गोपीनाथ गडावरील गोपीनाथ मुडेंच्या जयंती कार्यक्रमातही त्यांची थोडीसी नाराजी दिसून आली होती. त्यामुळेच, त्यांचा सक्रीय सहभाग या निवडणुकीत दिसला नाही, अशी चर्चा आहे.    

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी शनिवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दुपारी सभा होत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे नागरिकांचा मागास (महिला) प्रवर्गासाठी आहे. निकाल कळायला 13 जानेवारी उजाडणार आहे. आज शनिवारी मतदान होणार असले तरी कुणाच्या गळ्यात अध्यक्ष, उपाध्यक्षांची माळ पडली हे हायकोर्टाच्या आदेशामुळे 13 जानेवारीनंतरच कळणार आहे. मात्र, तत्पूर्वीच माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी भाजपाचा पराभव मान्य केल्याचं दिसून येतंय. ''राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही आहे रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली ..लोकशाहीची प्रक्रीया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत,'' असे ट्विट पंकजा यांनी केलं आहे. 

पंकजा मुंडे गेल्या अनेक दिवसांपासून भाजापात नाराज असल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठा पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचे बंधु धनंजय मुंडेंनीच पंकजा यांचा पराभव केला. त्यामुळे, जिल्हा परिषद निवडणुकीतही त्यांचा उत्फुर्त प्रतिसाद दिसला नाही. विशेष म्हणजे मतदानाच्यादिवशी त्या बीडमध्ये हजरही राहिल्या नाहीत. थेट अमेरिकेवरुन त्यांनी ट्विट करुन निवडणुकीची पार्श्वभूमी स्पष्ट केलीय.  दरम्यान, मंत्री धनंजय मुंडेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून विरोधकांच्या संख्याबळासच सुरुंग लावण्यात ते यशस्वी झाले आहेत. संख्याबळ आमच्याकडे असल्याचे आघाडीतर्फे सांगण्यात येत आहे. कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंनी जिल्हा परिषद निवडणुकीत आमचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर, दुसरीडे पंकजा मुंडेंनी निवडणुकीची जबाबदारी खासदार प्रितम मुंडेंवर सोपवली असून त्या विदेशात आहेत.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीडElectionनिवडणूकDhananjay Mundeधनंजय मुंडेTwitterट्विटर