ट्रॅक्टर पळवून नेण्याचा प्रयत्न; तिघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:03 IST2018-01-26T00:03:44+5:302018-01-26T00:03:47+5:30
उसाने भरून कारखान्याकडे जाणारा टॅक्टर रस्त्यात आडवून घेवून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एका आरोपीस पोलीसांनी अटक केले आहे

ट्रॅक्टर पळवून नेण्याचा प्रयत्न; तिघांविरुद्ध गुन्हा
धारुर : उसाने भरून कारखान्याकडे जाणारा टॅक्टर रस्त्यात आडवून घेवून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एका आरोपीस पोलीसांनी अटक केले आहे
तालुक्यातील जहाँगीरमोहा येथील सूर्यकांत कोकाटे यांचा टॅक्टर बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धारूर - केज रस्त्यावरुन धाराशिव कारखान्याला जात होता. यावेळी भिमाशंकर सीताप्पा सुतार, शिवानंद बिराजदार रा.कुंभारी जि. सोलापूर, जखाते जमखंडी यांनी कासारी फाटा येथे अडवून चालकास धमकाविले व ट्रॅक्टरचे हेड काढून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी चालकाने विरोध केल्याने यातील भिमाशंकर यास पकडले. तपास जमादार एम.बी. लांडगे करीत आहेत.