तिहेरी अपघातात तरुणाच्या पायावरून ट्रक गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:35 IST2021-04-02T04:35:44+5:302021-04-02T04:35:44+5:30

दीपक गाताडे रा. दिंद्रुड असे जखमी तरुणाचे नाव असून घरबांधकामाचा व्यवसाय तो करतो. दिंद्रुडहून वडवणीकडे काही कामासाठी तो दुचाकीवरून ...

The truck went off the young man's feet in a triple accident | तिहेरी अपघातात तरुणाच्या पायावरून ट्रक गेला

तिहेरी अपघातात तरुणाच्या पायावरून ट्रक गेला

दीपक गाताडे रा. दिंद्रुड असे जखमी तरुणाचे नाव असून घरबांधकामाचा व्यवसाय तो करतो. दिंद्रुडहून वडवणीकडे काही कामासाठी तो दुचाकीवरून (क्र. एम. एच. २२ जे ९३७६) निघाला होता. दिंद्रुडजवळ चाटगांव फाट्यावर समोरून येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दीपक रस्त्यावर पडला. त्याचक्षणी आंध्र प्रदेशहून गुजरातकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या (क्र. एपी ०७ टि एफ ९७१६) टायरखाली दीपकचा पाय चिरडला. या अपघातात त्याला गंभीर इजा झाली असून, एक पाय गमवावा लागणार असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यावेळी ताबडतोब अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दीपकला हलवले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, दिंद्रुड पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून त्याच्या दुचाकीला धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराचा शोध घेतला जात असल्याचे दिंद्रुड पोलिसांनी सांगितले.

Web Title: The truck went off the young man's feet in a triple accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.