बीड एआरटीओ कार्यालयावर ट्रक मालकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:25 IST2017-12-16T00:23:12+5:302017-12-16T00:25:34+5:30
बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे वाहनधारकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. केवळ पासिंग अभावी १०० पेक्षा जास्त वाहने उभी आहेत. त्यामुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.

बीड एआरटीओ कार्यालयावर ट्रक मालकांचा मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे वाहनधारकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. केवळ पासिंग अभावी १०० पेक्षा जास्त वाहने उभी आहेत. त्यामुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने कारभार ढेपाळला आहे. या कार्यालयात पासिंग ट्रॅकदेखील नाही. त्यामुळे वाहनधारकांना १०० ते १५० कि.मी. अंतरावरील अंबाजोगाई व जालना येथील कार्यालयात पाठविले जाते. तेथेही वाहनधारकांना ‘वेटिंग’च्या नावाखाली ताटकळावे लागत आहे.
परिवहन कार्यालयाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नसल्याने समस्या वाढत आहेत. येथील एआरटीओ कार्यालयात फिटनेस ट्रॅक उपलब्ध करावा, कायमस्वरूपी अधिकारी नेमण्यात यावा, रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, गैरहजर राहणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी अध्यक्ष विजय काकडे, उपाध्यक्ष शेख रफिक, सरचिटणीस सय्यद मुस्तफा, सहसचिव संजय गुरव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.